परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरच्या पायथ्याशी मुंबईच्या गिरणगावातील लाखो श्रमिकांच्या संघर्षाच्या, वेदनांच्या आणि अपूर्ण स्वप्नांच्या कहाण्या दडलेल्या आहेत. एकेकाळी गिरण्यांच्या भोंग्यांवर चालणारे गिरणगाव संपाच्या तडाख्याने हादरले आणि त्यानंतर जागतिकीकरणाच्या झगमगाटात गिरणी कामगारांचे अस्तित्वच धोक्यात आले. त्यांच्या कष्टांवर उभ्या राहिलेल्या शहरात त्यांच्याच वाट्याला विस्थापन, उपेक्षा आणि असुरक्षिततेचे आयुष्य आले.
मुंबईच्या औद्योगिक संस्कृतीचे प्रतीक असलेल्या गिरण्यांच्या जागी उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती विकासाचे नवे चित्र दाखवतात; मात्र या परिवर्तनामागील मानवी किंमत दुर्लक्षित राहते. दुसरीकडे, अंडरवर्ल्ड आणि सत्ताधारी आर्थिक हितसंबंध यांच्या कथित साटेलोट्यामुळे शहराच्या जमिनींच्या व्यवहारांना वेग आला. शांघाय आणि सिंगापूरसारखे आधुनिक शहर घडवण्याच्या स्वप्नांच्या आड जमिनीच्या आणि एफएसआयच्या व्यवहारांचे राजकारण तापले.
श्रमिकांच्या घामातून उभ्या राहिलेल्या मुंबईचा चेहरामोहरा बदलताना कोणाचे हित साधले गेले आणि कोणाची स्वप्ने चिरडली गेली, हा महत्त्वाचा प्रश्न हे लेखन उपस्थित करते. जागतिकीकरण, शहरी विकास, आर्थिक सत्तासंघर्ष आणि गिरणी कामगारांच्या अस्तित्वाचा वेध घेणारे हे लेखन मुंबईच्या झगमगाटामागील विदारक वास्तव समोर आणते.






Reviews
There are no reviews yet.