हरयाणातील पारंपरिक वातावरणात वाढलेली अनुराधा स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतःच्या एकांताला सोबत घेऊन प्रवासाला निघते. ज्ञान मिळवणे किंवा माहिती गोळा करणे हा तिच्या भ्रमंतीचा उद्देश नसून, स्वतःच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधणे हा तिचा प्रवास असतो.
या प्रवासात ती संस्कृती, समाज, आध्यात्मिकता आणि स्त्रियांसाठी ठरवलेल्या चौकटींकडे नव्या दृष्टीने पाहते. वेगवेगळ्या अनुभवांतून ती व्यक्तिगत अवकाश आणि आयुष्यातील आनंदाचे महत्त्व जाणून घेते. स्वतःचे स्वातंत्र्य अनुभवण्याची आणि सभोवतालच्या दांभिकतेला सामोरे जाण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक म्हणजे स्वतःची ओळख शोधण्याचा एक वेगळा प्रवास आहे.






Reviews
There are no reviews yet.