साहित्य म्हणजे केवळ लेखकाची निर्मिती किंवा शब्दांतून व्यक्त झालेली कल्पनाशक्ती नव्हे, तर त्यामागे कार्यरत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परिस्थितींचाही तो एक आविष्कार असतो. ‘मुक्तार्थ’ मधील साहित्यविषयक लेख लेखकाचे साहित्य, त्याचे चरित्र आणि साहित्यव्यवहाराला आकार देणारे व्यापक सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण या तीनही स्तरांचा वेध घेतात. साहित्याची निर्मिती, त्याचा आस्वाद आणि साहित्यकृतींचे स्वरूप यांचा सांस्कृतिक संदर्भांतून विचार करताना लेखकांचे भौतिक जीवन, त्यांची कल्पनाशक्ती, साहित्यनिर्मितीची साधने, वैचारिक भूमिका आणि वाङ्मयीन क्षेत्रातील घडामोडी यांमधील आंतरिक संबंध तपासले आहेत. त्याचबरोबर जाणीवपूर्वक आकाराला आलेल्या साहित्यचळवळींचा आणि त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यासही या लेखांतून केला आहे. इंग्रज वसाहतकाळातील साहित्यव्यवहारापासून साठोत्तर काळातील विविध साहित्यचळवळींपर्यंत अनेक दुर्लक्षित विषयांना या लेखांनी उजाळा दिला आहे. साहित्याकडे केवळ कलाकृती म्हणून न पाहता त्यामागील संस्कृती, समाज आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधांतून समजून घेण्याची दृष्टी देणारा ‘मुक्तार्थ’ हा साहित्य आणि संस्कृती-अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांसाठी महत्त्वपूर्ण लेखसंग्रह आहे.
ललित लेखन
मुक्तार्थ
₹495.00
‘मुक्तार्थ’ हा साहित्याकडे सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. लेखकाचे चरित्र, त्याचे साहित्य आणि साहित्यनिर्मितीमागील सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण यांचा परस्परसंबंध उलगडणारे हे लेख इंग्रज वसाहतकाळातील साहित्यव्यवहारापासून साठोत्तर काळातील साहित्यचळवळींपर्यंतच्या दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकतात.
Availability: 10 in stock
| Author | नीतीन रिंढे |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.