या कथासंग्रहातील कथा आधुनिक माणसाच्या आयुष्यातील विविध पेच आणि प्रश्न उलगडतात. सोशल मीडियावर जोडलेले असूनही प्रत्यक्ष आयुष्यात बदललेल्या मित्रांमधील नात्यांचा ताण, आर्थिक मंदी आणि आयटी क्षेत्रातील नोकरकपातीमुळे संकटात आलेल्या जोडप्याला मदत करणारा भाजीवाला, तसेच अनेक वर्षे मनात दडवून ठेवलेली जखम उघड झाल्यावर समोर येणारी एका व्यक्तीची कहाणी यात आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे आर्यन आणि संजिताच्या नात्यात निर्माण होणारे अंतर, एका साध्या सोशल मीडिया पोस्टमधून उघड होणारे सामाजिक वास्तव आणि आपल्या उगमाचा शोध घेत भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांत संचार करणाऱ्या गर्भाभोवती विणलेले गूढ कथानक अशा विविध विषयांचा संग्रहात समावेश आहे.
या कथा केवळ वैयक्तिक अनुभवांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर सामाजिक विषमता, मानवी संबंधांतील गुंतागुंत आणि अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांनाही स्पर्श करतात. वास्तव, कल्पित आणि मिथककथांची वैशिष्ट्यपूर्ण सांगड घालणारा हा संग्रह वाचकाला समकालीन जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करतो.
कथा-कादंबरी
नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य
₹250.00
‘आजच्या काळाच्या’ हा आठ कथांचा संग्रह आहे. आधुनिक जीवनातील मैत्री, नातेसंबंध, आर्थिक मंदी, आयटी क्षेत्रातील नोकरकपात, सामाजिक विषमता आणि अस्तित्वाचा शोध अशा विविध विषयांचा यात वेध घेतला आहे. वास्तव, कल्पित आणि मिथककथा यांच्या माध्यमातून आजच्या जगण्यातील ताणतणाव आणि गुंतागुंत मांडली आहे.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | प्रणव सखदेव |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.