गेल्या अनेक दशकांपासून भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आकाशवाणीचा इतिहास आणि तिचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. रेडिओवरील बातम्या, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि ज्ञानवर्धक उपक्रम यांमधून आकाशवाणीने श्रोत्यांशी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे नाते यातून समजते. या प्रवासातील रंजक घटना आणि रेडिओशी संबंधित निर्माते, निवेदक, रेडिओ जॉकी व श्रोत्यांच्या आठवणी पुस्तकाला विशेष रंगत आणतात. रेडिओचा इतिहास, प्रसारणविश्व आणि आकाशवाणीशी जोडलेल्या आठवणी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक एक वेगळा अनुभव ठरते.
माहितीपर
आकाशवाणी : गावं-शहरं-मनं जोडणाऱ्या ध्वनिलहरी
₹390.00
भारतीयांच्या मनामनांत रुजलेल्या आकाशवाणीच्या नव्वद वर्षांच्या प्रवासाची रंजक कहाणी या पुस्तकातून उलगडते. रेडिओवरील कार्यक्रम, बातम्या आणि त्यांच्याशी जोडलेल्या निर्माते, निवेदक, रेडिओ जॉकी व श्रोत्यांच्या आठवणींचा हा माहितीपूर्ण खजिना आहे.
Availability: 10 in stock
| Author | सुश्रुत कुलकर्णी |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.