सट्टक

₹550.00

स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी आणि शोषितांच्या जगण्यातील संघर्ष व वेदना प्रभावीपणे मांडणारा भालचंद्र नेमाडे यांचा वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह.

Availability: 10 in stock

Category:

‘देखणी’ या संग्रहानंतर सुमारे पस्तीस वर्षांनी प्रकाशित झालेला ‘सट्टक’ हा भालचंद्र नेमाडे यांचा महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे. आधुनिकीकरणाच्या प्रभावाखाली अधोगतीला लागलेले स्त्रियांचे जीवन, शेतकरी, कष्टकरी आणि शोषित समाजघटकांचे वास्तव या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या मूल्यहीन होत चाललेल्या जगण्यावर प्रखर भाष्य करणारा हा संग्रह संत चक्रधर, तुकाराम, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, महात्मा फुले आणि मर्ढेकर यांच्या साहित्यपरंपरेशी नाते सांगतो. ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ या तीन विभागांत विभागलेल्या संग्रहातून मानवी नात्यांमधील मोकळीक, माणुसकी, स्त्रीजीवनातील वेदना आणि जीवन-मृत्यूविषयीचे गूढ चिंतन व्यक्त होते. लोकसंगीताची लय आणि मौखिक परंपरेचा प्रभाव यांमुळे या कवितांना स्वतंत्र आकृतिबंध प्राप्त झाला आहे. मराठी कवितेला नवा आशय आणि वेगळे अभिव्यक्तिरूप देणारा हा संग्रह आहे.

Author

भालचंद्र नेमाडे

Publisher

पॉप्युलर प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सट्टक”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top