‘स्वेदगंगा’, ‘मृद्गंध’, ‘धृपद’ आणि ‘जातक’ या संग्रहांनंतर प्रकाशित झालेला ‘विरूपिका’ हा विंदा करंदीकर यांचा पाचवा कवितासंग्रह आहे. जीवनातील विविध कुतूहलांचा जाणीवपूर्वक शोध घेणारी त्यांची कविता छंद आणि मुक्तछंद अशा दोन्ही प्रकारांतून भाषेच्या लयीचा वेध घेते. संगीत आणि चित्रकलेच्या व्यासंगातून त्यांच्या कवितांमध्ये स्वर, ताल आणि चित्रमय प्रतिमा आकार घेतात. बालगीतांमधून बालमनाचे सूक्ष्म निरीक्षणही व्यक्त होते. समाजजीवनाशी एकरूप झालेली आणि वैयक्तिक अनुभवांतून आकारलेली ही कविता जीवनातील मूलभूत प्रेरणा, अनुभव, विचार आणि भावावस्थांना प्रभावीपणे अभिव्यक्त करते. एखाद्या अनुभवाला किंवा विचाराला वेगळ्या, अनोख्या रूपातून काव्यरूप प्राप्त होते, ही ‘विरूपिका’मागील मध्यवर्ती कल्पना आहे.
कविता
विरूपिका
₹175.00
जीवनातील विविध अनुभव, विचार आणि भावभावनांना काव्यरूप देणारा विंदा करंदीकर यांचा पाचवा कवितासंग्रह.
Availability: 10 in stock
| Author | विंदा करंदीकर |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.